” गो  कोरोना गो कोरोना “

कोरोना म्हणजे काय ?

कोरोना हा एक विषाणूंचा एक गट आहे ज्याची सुरवात चीन मधील वुहान प्रदेशातून झाली आहे आणि विषाणूचा प्रसार मानवांमध्ये सहसा श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात आणि बरी न होणारी सर्दी ,खोकला, ताप,श्वसनाच्या तक्रारी ही याची प्राथमिक लक्षणे आहेत.

कोरोना विषाणू दोन प्रकारे पसरतो

रुग्णाच्या खोकल्यातून

 • रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात.
 • हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात.
 • या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात.
 • आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर त्यातून त्याचा संसगर् होतो.

वस्तूंच्या स्पशार्तून

 • रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात
 • त्या वस्तूंना आपल्या हातांचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात
 • त्यानंतर जर हात चेहर्याला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसनमागार्तून जाऊन संसगर् होतो.

कोरोनाची लक्षणे

 • खोकला
 • घसा दुखी
 • ताप
 • नाकाला पाणी येणे
 • शिंका येणे, धाप लागणे
 • थकवा जाणवणे

हे करू नका

सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

ताप व खोकला लक्षणे असताना इतरांशी स्पर्श करू नये.

मांस आणि अंडी पूर्णपणे उकळून व शिजवलेली खा.

कत्तलखाणे व उघड्यावर मास असणाऱ्या ठिकाणी जाणे नये.(प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पर्श करू नये.

हे करू करा

आपले हात वारंवार स्वच्छ धुवा.

डोळे,नाक व तोंडला स्पर्श करणे टाळावे .

खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा टिश्यू पेपर किंवा हाताच्या कोपराचा वापर करावा .

निकट संपर्क टाळावे .

जर आपल्याला ताप,खोकला किंवा श्वास घेताना त्रास होत आहेत तर लवकरच वौद्यकीय सेवा घ्या.

काळजी करू नका ,सावध रहा

करोना आजार कसा पसरतो ?

कोरोना व्हायरस Corona Virus म्हणजे काय ?

करोन आजार हा ज्या व्यक्ती ला करूना  ची लागण झालेली आहे ,ती वेक्ती च्या शिंकण्या-खोकल्यातून तेंब बाहेर पडतात त्यातून हा आजार पसरतो. कोरोना व्हायरसने पिडित असलेला एखादा व्यक्ती तर तुमच्या आजूबाजूला शिंकत किंवा खोकत असेल तर त्याच्या श्वासांतून येत असलेले व्हायरस हवेत पसरून तुम्ही जेव्हा श्वास घ्यास तेव्हा कोरोना व्हायरस होण्याची शक्यता असते. या शिवाय शिंकण्या – खोखल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर  पडतात .अशा  पृष्ठभागाला स्पर्श  केल्याने हे थेंब हाताला चिकटतात .हाताने वारंवार चेहरा ,डोळे ,नाकाला स्पर्श  किंवा चोळण्याच्या सवयीमुळे देखील हा आजार पसरू शकतो .

म्हणून वारंवार हात धुणे व  बाहेर जाताना मास्क चा वापर करावा .

गौरसमज

 • नीट शिजवलेल्या नॉनव्हेज अन्नापासून होत नाही .
 • पाळीव प्राण्यांपासून धोका नाही.
 • प्रत्येक सर्दी खोकला हा कोरोना आहे असे समजू नका .
 • चायनीज अन्नपासून किंवा वस्तूंपासून होत.

अफवांवर विश्वास ठेऊ नये

कोरोना व्हायरस Corona Virus म्हणजे काय ?

सोशल मीडियावर करोना व्हायरस संदर्भात अनेक विविध अर्धवट माहिती असणारे ,मनात चुकीची भीती तयार करणारे  संदेश फिरतात आहेत ,असे  कोणतेही संदेश हे अधिकृत स्रोतांकडून  खात्री करून घेतल्या शिवाय पुढे इतर व्यक्तीस पाठवू नये .

वरील प्रकारची लक्षणे आल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा .

 • राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र : 020-2612 7394
 • टोल फ्री क्र : 108
 • राष्ट्रीय कॉल सेंटर क्र. : +91-11-2397 8046
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •