कोरोना व्हायरस Corona Virus म्हणजे काय ?
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कोरोना व्हायरस म्हणजे काय ? (what is Coronavirus )

कोरोना व्हयरस म्हणजे सर्दी खोकल्यातून ते मर्स  किंवा सार्स सारख्या गंभीर कारणीभूत असणाऱ्या एका विशिष्ठ प्रकारच्या  व्हयरस गटास कोरोना व्हयरस असे म्हणतात .

कोरोना हा एक विषाणूंचा एक गट आहे ज्याची सुरवात चीन मधील वुहान प्रदेशातून झाली आहे आणि विषाणूचा प्रसार मानवांमध्ये सहसा श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात आणि बरी न होणारी सर्दी ,खोकला, ताप,श्वसनाच्या तक्रारी ही याची प्राथमिक लक्षणे आहेत.

कोरोना व्हायरस Corona Virus म्हणजे काय ?

कोरोना व्हायरसची लक्षणं

 • सर्दी
 • ताप
 • खोकला
 • घसा खवखवणे
 • श्वास घेताना त्रास

प्रत्येक सर्दी खोकला हा कोरोना आहे असे समजू नका .

 

“आपल्याही कोरोना विषाणूला आपल्या पासून दूर ठेवण्यात विशेष काळजी घेण्याची गरज आहे.खालील गोष्टी करा …..स्वतःला आणी  इतरांना सुरक्षित ठेवा.

स्वच्छता ठेवणे आवश्यक :-

कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी वैयक्तिकस्तरावर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. हात स्वच्छ धुणे, सार्वजनिक ठिकाणी जास्त वापरायच्या वस्तूंना स्पर्श न करणे, गर्दीचे ठिकाण टाळणे आदी बाबी आवश्यक आहेत.

कोरोना व्हायरस पासुन वाचण्याचा मार्ग :-

 • साबण व पाणी वापरून आपले हात स्वछ धुवा
 • नेहमीच सॅनिटायझरने हाता धुवा.
 • स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.
 • सार्वजनिक वाहतूक वापरल्यानंतर, हात स्वच्छ न करता त्यांना आपल्या चेहरयावर आणि तोंडावर लावू नका.
 • आजारी लोकांची काळजी घेताना आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्या. आपले नाक आणि तोंड झाकून ठेवा.
 • तुम्हाला सर्दी-खोकला-ताप असेल तर काळजी घ्या, त्वरीत डॉक्टरांना दाखवा आणि आवश्यक ती औषधं घ्या.

व्हिडिओ नक्की पहा पूर्ण कोरोना विषयी ची माहिती आहे .

 

माहिती आवडल्यास  शेअर करा आणि अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

नोटः सोशल मीडियावर करोना व्हायरस संदर्भात अनेक विविध अर्धवट माहिती असणारे ,मनात चुकीची भीती तयार करणारे  संदेश फिरतात आहेत ,असे  कणतेही संदेश हे अधिकृत स्रोतांकडून  खात्री करून घेतल्या शिवाय पुढे इतर व्यक्तीस पाठवू नये .


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •